नकार.
नकार.
तुझ्या नकाराने माझ्या मनात असलेले तुझ्याबद्दल आदराचे स्थान बदलत नसते
तुझ्याविना किती सावरावे स्वतःला, दिवस तर ठीक आहे मात्र रात्र सोपी नसते
तुझे सौंदर्य, तुझे लक्षणीय नयन आजही मला तुझ्यावर भाळण्यास मजबूर करतात
कितीही मनाने कणखर दिसत असलो, मात्र उशीवरील अश्रू विरहाची ग्वाही देतात
तुझा तो साडीवरील फोटो आजही मला त्याच निर्मळ प्रेमाने तुझ्याकडे खेचतो
तुझ्यासोबतचा एक एक क्षण मला त्या निर्मळ मैत्रीची आठवण करून देतो
तुझे ते प्रेमळ बोलणे, निर्मळ मैत्रीने वागणे यात माझ्या वेड्या हृदयाचा तोल घसरला
अन् आज तुझ्या माझ्यातील मैत्रीच्या करारालाही पूर्णविराम लागला
कसे हे सर्व घडले अन् तुझ्या माझ्यातील मैत्रीमध्ये आला हा हृदयभेदक दुरावा
शेवटी फक्त तुझ्या आठवणीच आहेत माझ्याकडे आपल्या मैत्रीचा पुरावा
शेवटी एकच सांगेन तुला, कधी वेळ मिळालाच तर माझ्या कविता तू वाच
अजूनही प्रत्येक ओळीत, प्रत्येक शब्दात अन् प्रत्येक अक्षरात मिळवशील स्वतःलाच...

