हो मी तयार आहे...
हो मी तयार आहे...
हो मी तयार आहे
हो मी तयार आहे
तू माझ्या जीवनाचे गीत हो
मी तुला गायला तयार आहे.
तू बागेतील मोगरा अन् गुलाब हो
मी तुझा सुगंध व्हायला तयार आहे
तू भावनांचा अथांग समुद्र हो
मी प्रेमजलाचा मासा व्हायला तयार आहे
तू प्रेम-विश्वाचे आभाळ हो
मी प्रेमपक्षी व्हायला तयार आहे
तू टिम-टीमणारी चांदणी हो
मी तुझा चंद्र व्हायला तयार आहे
सर्वजण म्हणतात मला
मी मृत्युला घाबरणारा आहे,
पण तू विष जरी जाहली तरी
मी तुला प्यायला तयार आहे

