कधी तू...
कधी तू...
कधी तू काळीभोर रात्र
मी टिम-टीमनारा तारा
कधी तू मंद हवेची झुळूक
तर मी सळसळणारा वारा
कधी तू अनमोल वेळ
मी टिकटिकणार घड्याळ
कधी तू शांत स्वभावाची
तर मी मात्र खट्याळ
कधी तू गुलाबाचा कोमल स्पर्श
मी त्याच्या काट्यांनी होणारा त्रास
कधी तू प्रेमाच्या शाळेतली परीक्षा
तर मी मात्र त्यात नापास

