मन प्रेमात उडतंय...
मन प्रेमात उडतंय...
तुला बघताचं राणी
मंद झाले हे वारे,
तुला बघताचं राणी
स्थिर झाले हे जग सारे.
तुला ऐकतांना राणी
माझे मन बावरे झाले,
तुला ऐकतांना राणी
माझे कान तृप्त झाले.
तुझ्यासवे बोलतांना राणी
माझे स्वर हे डगमगले,
तुझ्यासवे बोलतांना राणी
मला शब्द नाही सुचले.
आज मला सांग राणी
हे सर्व असं का घडतंय,
माझ मन नावाचं पाखरू
तुझ्या प्रेमात तर नाही ना उडतंय.

