उमलली प्रेमाची कळी...
उमलली प्रेमाची कळी...
आज मोबाईल चाळतांना
तुझा फोटो मला दिसला,
तुझे सुंदर सुंदर रूप बघून
माझ्या बागेतील मोगराही लाजला.
तुझे ते निळेशार डोळे अन्
त्या डोळ्यातील काजळ,
स्पष्ट दिसतंय मला त्यात
माझ्याबद्दल प्रेम निर्मळ.
तुझी ती लांबलचक वेणी
अन् तो वेणीवरील गजरा,
आज तुझा फोटो बघूनच
माझा जीव का होतोय लाजरा.
तुझे ते मंद मंद स्मितहास्य
अन् ती गालावरील खळी,
आज माझ्या मनात गं
उमलली प्रेमाची कळी.

