तू...
तू...
तुझ्याविना मला आता काहीच सुचत नाही
कविता तर सोड साधी चारोळी सुद्धा जमत नाही,
कधी काळी तुझ्या सौंदर्याचा लेखक होतो मी
आता मात्र तुझ्यावर एक अक्षर देखील लिहित नाही...
वाटले सोडेन तुझा विचार कायमचा
तू फक्त स्वप्न, माझे आयुष्य नाही,
कधी तीन तीन तास फोनावर बोलणे आपले
तर आता साधा मिस कॉल सुद्धा होत नाही...
या विचारातून कधीच बाहेर पडलो मी
की माझं तुझ्यावर पण तुझं माझ्यावर प्रेम नाही,
पण तू अशी अर्ध्यातून सोडलेली मैत्रीची साथ
मला आयुष्याच्या संघर्षात पुन्हा लढू देत नाही...

