#गर्दी
#गर्दी
माणसांच्या गर्दीत माणूसपण हरवलेले दिसतेय
बघ्याची संख्या मात्र महापुरासारखी वाढतेय.
अपघाताच्या ठिकाणाचा व्हिडिओ येतो मोबाईलवर बिचाऱ्यांचे जीव वाचतील मदत मिळाली वेळेवर.
अरेरे ,बापरे उगाच वायफळ उद्गार
मदतीला मात्र नाही पुढे सरसावणार.
एखादा गेलाच पुढे तर अतीशहाणा ठरवणार
झाली त्याची वाहवा तर तोंड वाकडे करणार.
एवढे काही विशेष नाही उगाच कौतुक होतंय
मीपण हे केले असते नंतर शहाणपण सुचतंय.
मोठेपणा द्यायला सुद्धा मोठं मन लागतं, म्हणून तर माणसांच्या गर्दीत एखाद्याचंच शहाणपण दिसतंय.
प्रा.सौ नलिनी लावरे
