#ओझे
#ओझे
कुठवर व्हावे ओझे मी पणाचे
निसटून जाती क्षण आनंदाचे
क्षणभंगुर ह्या आयुष्यातील
कसे करावे भाकीत उद्याचे
माझ्यातला मी तू तुझ्यातला
मान अपमान करावा कशाला
ओठावर येती दोन शब्द प्रेमाचे
कमी होईल अंतर हळूहळू नाराजीचे
घडी आत्ताची असे मोलाची
हवी कशाला चिंता उद्याची
काळजीचा सूर हरवावा
दिसतील डोळ्यांत मनोरे सुखाचे
