#आगमन
#आगमन
1 min
403
तान्हुल्याचे रडणे
घरभर ऐकू येते
आगमनाच्या त्याच्या
कौतुक भारी होते
माझा बछडा म्हणून
सारे घेती कवेत
आनंदाला पारावार
नाही हो उरत
वेळेची ती पर्वा
कसली राहत नाही
गोड कौतुकाचे बोल
ओसंडून वाहत राही
घरपण येते घराला
शांतता पळून जाते
एका त्याच्या येण्याने
सारे उत्साहित होते
विसरती साऱ्या वेदना
हसऱ्या चेहऱ्याकडे बघताना
प्रा.सौ. नलिनी लावरे
