#काळोख
#काळोख
आयुष्याच्या पाटीवरची
जरी अक्षरे पुसट झाली
सोबतीला तू हवा
चिंता जगाची मग कसली
लग्नानंतरचे घर हक्काचे
सुखावते मनोमनी
पंचविशी माहेरातली
तरी चार दिवसांची पाहुणी
मशीन सारखे धावून धावून
थकून जाते विचारी
जिथल्या तिथली कामे
जशी तिचीच जबाबदारी
असावं हक्काचं कोणीतरी
मन मोकळं करायला
अनेक वर्षाचा संसार सोडून
लागणार नाही टोकाचे
पाऊल उचलायला
प्रा. सौ. नलिनी लावरे
