#जाणीव
#जाणीव
स्वप्न सोनेरी बघता बघता रात्र सरून गेली
अर्ध्यावरती हात सोडून निमुट चालती झाली
गप्पागोष्टी करून झाल्या नयन भरून आली
आयुष्याच्या खाचखळण्यावर मात करत राहिली
सुखदुःखाच्या वाटेवरील काटे वेचून घेतली
सोशिक मन हे तिचे कसे भावना जपत राहिली
जाणीव सतत जबाबदारीची पूरती दबवून गेली
पार करण्या प्रत्येक टप्पा परीक्षा देत राहिली
तिच्या भावनांची कोणी ना जाणीव कधी ठेवली
तक्रारीचा सूर जरा कधी , मग वेडीच ठरवली
बालपणीचे ते क्षण आनंदाचे आठवणीत गुंतली
प्रा.सौ नलिनी लावरे
