#मनातील सल
#मनातील सल
'आईचे संस्कार ' संसाराचा गाडा दोघांनी ओढायचा
रुसवा फुगवा सोडून हसत खेळत करायचा
संस्काराच्या ओझ्याने आता खूप दबल्यासारखं होतं मनातल्या वेदना कळायला प्रेमाच माणूस लागतं
ऑफिस ते घर धावपळ, सतत मशीनसारखे काम वाढत्या वयाबरोबर असावा थोडा तरी आराम
म्हणतात स्वतःला वेळ द्यायला आपल्या हातात असतो पण एका मागे एक जबाबदारीने जास्त गुंता वाढतो गोकुळासारखे वाटेल कसे भरलेल घर
तिथे लागावा राबण्यासाठी सर्वांचाच हातभार
खरंच काहो याला खरे सुख म्हणतात
कसे काय मग एकेक करत नाती दूर जातात
कधीतरी असं काही अघटीत घडून जातं
संसाराचं चाक अचानक निखळून बाजूला होतं
आई-वडिलांचे प्रेम सर्वांनाच मिळते असं नाही
अर्ध्यावर डाव मोडला की दिसते
फक्त कष्ट उपसणारी आई
प्रा.सौ. नलिनी लावरे
