#मुखवटा
#मुखवटा
देवापाशी आसरा सर्वच
फुलांना नाही मिळत
पण तरी उमलायची
एकही नाही राहत
सर्वच झाडाची फुले
नाही जात देवघरात
त्यातली काही हळूच
धरतीवर विसावतात
हाताची पाची बोटे
एकसारखे नसतात
एका बोटाला काही झालं
तर सारे रुसून बसतात
सुंदर असणे हे काही
आपल्या हातात नसते
मनाची सुंदरता ही फक्त
पारखी नजरच शोधते
नशेमध्ये सर्वच माणसे
सारे खरे बोलतात
वरवर मात्र चांगुलपणाचे
खोटे मुखवटे घालतात.
प्रा.सौ नलिनी लावरे
