# शुभ्र पांढरा
# शुभ्र पांढरा
सडा अंगणी छान प्राजक्ताचा
संदेश देई नव्या सुरुवातीचा
श्वेत फुल ते पहुडले शांत
जसे शिरले आईच्या कुशीत
पाकळ्या अलगद पडती जमिनीवर
देठ राहतो सरळ वर
पसरे चोहीकडे मंद दरवळ
प्राजक्ताचे फुल हे निर्मळ
घेई हिंदोळे झुळकी सरशी
एकवटते सर्व जाता बुंध्याशी
नजर शोधित असे भाविकाला
घेऊन जाण्या तव पूजेला
वागावे जरा थोडे संयमाने
होईल मग देव्हाऱ्यात जाणे
प्रा.सौ. नलिनी लावरे
