#विश्वास
#विश्वास
स्वभावातले गुण अवगुण
घ्यावे लागतात समजून
नमते घ्यायचे किती
ठेवावे मनाला सांगून
प्रसंगानुरूप येथे शहाणपण
आपोआप सुधारतो आपण
अहंकाराला मिळतो बढावा
कायम माघार घेऊन
ऊर्जेला भरपूर साठवा
दूध तुपातले खाऊन
नव्या रंगाची नवलाई
नऊ दिवसांची नसावी
प्रेमाचा ओलावा देऊन
नात्यांची जपणूक करावी
कष्टाने मिळवलेले सारे
सर्वांनी जीवापाड जपावे
एका हाताने दिले तर
दुसऱ्या हातात मिळावे
प्रा.सौ नलिनी लावरे
