STORYMIRROR

Manda Khandare

Classics

3  

Manda Khandare

Classics

हल्ली

हल्ली

1 min
266

विचार विचारात इतके 

गुंततात का हल्ली. 

वाटा निष्कर्षाच्या ... 

हरवतात का हल्ली. 


मनाची धाव आठवणींच्या

पाणवठ्यावर नेहमी. 

तरी जुन्या जख्मा तहानलेल्या

 राहतात का हल्ली. 


पैलतिरी सोडून आले 

जरी गाठोडे दुःखाचे. 

तरी सावल्या त्याच्या समीप

भसतात का हल्ली. 


उभ्या जन्माचे हिशोब दिले

नशीबाच्या हाती. 

मागचे उरलेले हातचे असे

छळतात का हल्ली. 


गाव दुर राहिला, 

सुखाचे होते घरटे जिथे

विसरूनही ते चेहरे स्मृतीत

रडवतात का हल्ली. 


खपली जरी उडाली 

घाव पूर्ण भरल्यावर. 

तरी गाभाऱ्यात जखमा 

ठसठसतात का हल्ली. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics