STORYMIRROR

Manda Khandare

Others

3  

Manda Khandare

Others

#गौरव मराठी भाषेचा

#गौरव मराठी भाषेचा

1 min
179

माझ्या माय मराठीचे

गाऊ किती गुणगान

ज्ञानोबा माऊलीने

दिला हिला बहुमान


पहाटेच्या परी ओवी

गाये जात्यावर जनाबाई

अरे संसार, संसार म्हणत

ज्ञान देते बहिणाबाई


गोडवा माय मराठीचा

जणू साखरेचा पाक

भक्ति रसातून वाहे

जणू अमृताचे पाट


माय बोलीचे उपकार

मनी चे भाव कसे जाणते

पान्हावलेल्या डोळ्यातुन

माय जशी मनात शिरते


कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी

होई आनंद सोहळा

राजभाषा दिनाचा

हा शाब्दिक मानाचा सोहळा


साहित्याला गुण द्या
लॉग इन