अभंग
अभंग
भक्तांचा कैवारी l विठू माझा हरी
आले तुझ्या दारी l पांडुरंगा ll१ll
डोळ्यातून वाहे l माय चंद्रभागा l
सुखाचीये धागा l प्रसादाचा ll२ll
लाभता दर्शन| आनंद आगळा|
सुखाचा सोहळा| अंतरंगी॥३ll
घेऊनी मृदंग l भक्तीत रंगुनी l
ध्वनी गोड कानी | विठूराया ll४ll
रिंगणात अश्व l मनी तुझी मूर्ती
जगभर कीर्ती l स्वर्ग माझा ll५ll
करूनिया ध्यास l वारीचा जागर l
देहाचा आगर l प्रपंचात ll६ll
सावळे रुपडे l हे कमलपुष्प l
तुळशीचे गुच्छ l वृंदावनी ll७ll
तुझी रे कणव l चरणाचीओढ l
हरीनाम गोड l मुखी असे ll८ll
माय बाप माझे l विठू रखमाई l
आळवी अंगाई l कान्होपात्रा ll९ll
बळीचे जीवन । होई मातीमोल।
बिचारा अबोल। नेहमीचा ll१०ll