STORYMIRROR

Manda Khandare

Drama Romance Fantasy

3  

Manda Khandare

Drama Romance Fantasy

पुन्हा आली थंडी

पुन्हा आली थंडी

1 min
208

धुक्याच्या साथीने चुंबावे धरणीला पुन्हां आकाशाने 

क्षितिजाचे मोडून पडावे कवडसे पुन्हां या बहाण्याने


चरा-चरात सोहळा हा प्रेमाचा पुन्हां साजरा व्हावा

धरणीला आलिंगन देताच पुन्हां फुलांचा वर्षाव व्हावा


खळखळणाऱ्या नदीचे क्षणात संगीत व्हावे

पारिजातकाचे जमिनिवर पडताच पुन्हां पडघम व्हावे


दवाच्या थेंबाने नाजुक कळीचे पुन्हां फुल व्हावे

फुलांच्या सुगंधाने निरभ्र आसमंत पुन्हां दरवळावे


कोकीळे संग मैनेचा ही गळा खुलावा

चंद्र तारकांचा जमिनिवर पुन्हां मेळ व्हावा


वडाच्या पारंब्यांनी अलगत पुन्हां धुक्या सम झुलावे

धरणीने गाली हसुन गवत फुला संगे पुन्हां डुलावे


या गुलाबी थंडीने धरित्रीचे सौंदर्य पुन्हां खुलावे

पाना,फुलात,निसर्गाचे वरदान पुन्हां हसावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama