Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manda Khandare

Romance

3  

Manda Khandare

Romance

तुला न दिलेली पत्रे

तुला न दिलेली पत्रे

1 min
266


तुला न दिलेली पत्रे म्हणजे

उसना घेतलेला श्वास आहे. 

माझ्या जगण्या साठी सख्या

हिच एक बाब खास आहे. 


तुला न दिलेली पत्रे म्हणजे

अनामिक भीतीचा फास आहे

या बेभरवशाच्या ज़िन्दगी ची

एक न तुटणारी बघ आस आहे. 


तुला न दिलेली पत्रे म्हणजे 

तुला न विसरण्याची कास आहे. 

शब्द शब्द श्वासात विरून

वेदनेचा होतो बघ ऱ्हास आहे.


तुला न दिलेली पत्रे म्हणजे 

उर्मिलेच्या विरहाचा त्रास आहे

विचारांमधल्या नुस्त्या सावल्यांचे

भयाण खेळाचे बघ भास आहे


तुला न दिलेली पत्रे म्हणजे

फुलांचा गंधाळलेला वास आहे

तुझ्या शब्द सुमनांच्या मोहिनीने

झाले मी, तुझी बघ दास आहे.


Rate this content
Log in