तेव्हा माझ्याशी बोलत जा
तेव्हा माझ्याशी बोलत जा
जेव्हा तुझ्या सागरी डोळ्यांच्या काठावरून खरे पाणी उसळून येईल
तेव्हां माझ्याशी बोलत जा....
जेव्हा तुझ्याच विचारांची भीती तुझ्या मनात घर करेल, बुद्धि आणि मनाचे द्वंद चालेल
तेव्हा माझ्याशी बोलत जा....
जेव्हा आपलेच तुझी साथ सोडतील, त्या अनावर झालेल्या विरहाने तुला गहीवरून येईल....
तेव्हा माझ्याशी बोलत जा....
आठवणींचे काहूर जेव्हा अस्वस्थ मनाची घालमेल वाढवतील, जर-तर च्या मधे आयुष्य अडकवून पड़ेल
तेव्हा माझ्याशी बोलत जा.....
पावसात मनसोक्त चिंब भिजूनही ख़ोल मनाच्या गाभाऱ्यात शुष्कतेची हुळहुळी भरेल
तेव्हा माझ्याशी बोलत जा..
जेव्हा तुझ्या थकलेल्या जीवा वर आधाराचे झाडच ऊन पांघरूण तुझ्या वर हसेल.
तेव्हा माझ्याशी बोलत जा...
मी आहे,आणि मी कायम असेन
तुझी सावली....तुझ्या सोबतीला..
अनंत काळाच्या शेवटापर्यंत

