STORYMIRROR

Manda Khandare

Abstract Inspirational

3  

Manda Khandare

Abstract Inspirational

सुरकुत्या

सुरकुत्या

1 min
192

त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर दिसतात, 

फाटलेल्या आयुष्याला शिवलेल्याच्या अनेक खुणा.... 

बिकट परिस्थितीत आलेली जाणीव, 

आणि उमजत गेलेल्या नेणिवेतुन होणारी फरपट 

अश्या कित्येक क्षणांची साक्ष देत राहतात त्या सुरकुत्या.... 

निर्जीव,क्षीण झालेले डोळे भकासपणे बघत असतात उघड्या आभाळाकडे, 

पण आताशी कुठलाच हिशोब मागत नाही तो आभाळाकडे.

उभे आयुष्य त्याचे 

त्याच आभाळच्या मर्जीवर गेले होते. 

पण त्याची कृपादृष्टी नेहमी कृपण ठरली होती याच्या बाबतीत..... 

याने हंगाम मागावा 

आणि त्यानी द्यावा दुष्काळ 

याने मागावी सर पावसाची आणि त्याने द्यावा ओला दुष्काळ...... 

हे खेळ खेळत राहिले आभाळ आणि 

नशीब देत राहिले सतत चटके.....

कित्येक सवंगळी तर

अशाच दाहकतेत

लटकले जीवन मरणाच्या झोपाळ्यावर..... 

आभाळ आणि सरकार मात्र बघ्या च्या भूमिकेतच राहिले कायम..... 

आणि सारे खेळ,साऱ्या योजना,सारे कायदे कागदावरच राहिले..... 

त्याचे आयुष्य मात्र असेच निकामी खर्ची होत गेले 

वाट बघण्यातच .... 

त्याच्या चेहऱ्यावरची एक एक सुरकुती गवाही देत होती सरकारी योजनांच्या चूरगळलेल्या कागदासारखी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract