आला राखीचा सण
आला राखीचा सण
1 min
139
आला राखीचा हा सण
भावा बहिणी चा दिन
माहेरच्या वाटे वर
धावे अधीर हे मन
डोळे भरून हे येता
भास मनास का होतो
भावाच्या रे भेटी साठी
जीव कासावीस होतो
नाते जीवा भावाचे हे
नसे कच्चे हे बंधन
जुळे रेशमी धाग्याने
मनाचे खोल कोंदण
दादा तुझ्यामुळे आज
आभाळ ठेंगणे झाले
बळ पंखात भरले
जीवन यशस्वी झाले
आशीर्वाद दे तू मज
दुधाची साय होऊन
भाऊ वडिलांच्या जागी
शाल प्रेमाची घेऊन