STORYMIRROR

Manda Khandare

Classics

4  

Manda Khandare

Classics

आला राखीचा हा सण

आला राखीचा हा सण

1 min
416

आला राखीचा हा सण

भावा बहिणी चा दिन

माहेरच्या वाटे वर

धावे अधीर हे मन


डोळे भरून हे येता

भास मनास का होतो

भावाच्या रे भेटी साठी

जीव कासावीस होतो


नाते जीवा भावाचे हे

नसे कच्चे हे बंधन

जुळे रेशमी धाग्याने

मनाचे खोल कोंदण


दादा तुझ्या मुळे आज

आभाळ ठेंगणे झाले

बळ पंखात भरले 

जीवन यशस्वी झाले


आशीर्वाद दे तु मज

दुधाची साय होऊन

भाऊ वडिलांच्या जागी

शाल प्रेमाची घेऊ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics