कवीकट्टा साहित्य संमेलन
कवीकट्टा साहित्य संमेलन
त्या वृक्षाच्या तळी
अंथरूण माझी गोधडी
उसवावीत टाके मी
माझ्याच कपाळावरची
अन् या सृष्टीने दृष्टी लाभून
मज युगे दिसावी दूरची
निश्चल एकचित्त
बसून जरा निवांत
वादळाच्या विनाशाचे
मी हिशोब मांडून पहावे
अन् वाचलेल्या लेकरांना माझ्या
मन भरून कुरवाळावे
सुकलीच पानं फूटतात
सार्या माझ्या झाडांना
वारसा उन्हाचा
पिढ्यानपिढ्यांचा
मग मी सूर्यवंशी होतो खरा
भेगाळल्या भूईची
ओळख जूनीच र्हदयी
आज लिंपीतो दूःखांना
अन् अभंग होत जातो