आई - कविता...
आई - कविता...
आई आई कुणास हाक मारु मी सांग न मला
तुझ्या पदरात तान्ही मी जीव तुझा अडकला..
थेंब अमृताचे ओठी स्पर्श ममतेचा ओला
सोडून गेलीस तान्हा जीव पाळण्यात एकला..
आई जगात ह्या पोरका जीव माझा जाहला
घास कोरडाच तुझ्यावीण ओठी अश्रूचा प्याला..
बाबा दारोदार तुजवीण अनवाणी तहानलेला
ममतेची घागर भरलेली मजसाठी शोधत राहयला..
सांगू कसे मज दुःख जगा या श्वास कोंडलेला जीव घुसमटलेला बोलताना आई कंठ दाटलेला..
आठवते मायेची कुशी मांडीवर बाळ मी निजलेला
पदर ओला आई नदी डोळयाला पूर आलेला...
सांग ना आई तुला मी कुठे शोधू जग अनोळखी
तुजविण रिते नभ सागर हा किनारा भेगाळलेला..
आई होऊनी आता पंखात घेतले मज पिल्लांना
ऊडण्या पंख दिले मज बळ अश्रुनी जगण्याला..
आई तुझ्यामुळे हा श्वास जन्म मज लाभला
जगताना श्वास श्वास तुज ममतेसाठी जीव व्याकुळला..
असते मी दुःखात दिसतो मज तुझा धुदंलासा चेहरा
मायेचा हात पाठीवर डोळे भरलेले हुंदका दाटलेला..