STORYMIRROR

Shobha Wagle

Classics

4  

Shobha Wagle

Classics

गुढी उभारू

गुढी उभारू

1 min
320

नव वर्षाचे स्वागत

करू चला आनंदाने

गुढी उभारू प्रेमाची

भेटू सर्वांना प्रेमाने


सण पाडवा चैत्रात

साडी गुढीला जरीची

माळा घालू शोभिवंत

जपू रीत संस्कृतीची


परंपरा पाडव्याची

खाऊ कडूलिंब गोळी

नाही चिंता आरोग्याची 

जेवणात मस्त पोळी


साडेतीन मुहूर्ताचा

सण पाडवा असतो

नवे कार्य शुभारंभ

याच दिवशी करतो


माणुसकी जपू सारे

करू साजरा पाडवा

प्रेम भाव तो अर्पूया

मनी ठेऊनी गोडवा


नष्ट करा कोरोनाला

विनवितो तुला देवा

टळो संकट देशाचे

खातो आशेने हा मेवा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics