उत्साही श्रावण
उत्साही श्रावण
उत्साही श्रावण
^^^^^^^^^^^^^^^
मराठी वर्षाचा पाचवा महिना
ऋतू श्रावण पवित्र मांगल्याचा
पानोपानी हिरवाईने नटलेला
रिमझिम पाऊस बरसण्याचा.
मास व्रतवैकल्ये पूजन करण्याचा
श्रावणी सोमवार शंभो शंकराचा
दूध, फूल, बेलपत्र पिंडीस वाहुनी
अभिषेक शिवा घालुनी उपवासाचा.
मंगळवारी मंगळा गौरी पूजनाचा
बायकांनी झिम्मा फुगडी घालण्याचा
नाच गाणे गात रात्रभर जागरणाचा
माहेरवाशीणीचा आनंद घेण्याचा.
विविध धार्मिक कार्ये ती श्रावणात
शुक्रवार हळदीकुंकू वाण देण्याचा
शनिवार, शनिदेव, मारुती पूजनाचा
रविवार,सूर्य,चूल उंबरा पूजनाचा.
पानांची हिरवळ नि फुलांचा दरवळ
मन मोहक आल्हाददायक करण्याचा
नभात सप्तरंगी इंद्रधनुष्य दर्शनाचा
ऋतू सुंदर सौंदर्याने डोळे दिपण्याचा.
शोभा वागळे
मुंबई.
8850466717

