कृतज्ञता
कृतज्ञता
*कृतज्ञता*
आज बैल पोळा सण
बैल दिन विश्रांतीचा
न्हाऊ घालून सजवू
खाऊ त्याला पुरणाचा.
करू पूजन आरती
माझ्या संगती राबतो
वर्षभर त्याची साथ
ऋण बैलाचे स्मरतो.
घालू घंटा माळ गळी
शिंगे रंगवू फुलांनी
नेऊ मिरवणूकीला
मस्त गावा गावातुनी.
माझ्या पोरां-थोरां साऱ्या
कुटुंबाच्या आनंदाचा
ढवळ्याचा पवळ्याचा
दिन आज आरामाचा.
.
माझा मुका मित्र राजा
शिवारात उपसतो
माझ्या सोबत कष्टतो
तुझ्या ऋणात राहतो.
शोभा वागळे
मुंबई
8859466717
