STORYMIRROR

Kavita Mahamunkar

Tragedy Action

3  

Kavita Mahamunkar

Tragedy Action

व्यथा

व्यथा

1 min
413

हलली पाळण्याची दोर

जन्माला आली पोर

काळीज झालं चर्रर्र

आईबापाच्या जीवाला घोर.


मुलगा आणि मुलगी

होई भेदभाव

वागणुकीत ही 

मिळे दुजाभाव.


उपवर होता लग्नाची घाई 

असे साऱ्या घराला

आला पहिला वर

दिली पहिल्या वराला.


नव्या वाटा,नव्या दिशा

नव्या घरी पदार्पण

पतीच्या घरी करी

स्वतःला समर्पण.


ही व्यथा आहे

सारी नारी जातीची

पतीच्या चितेवर

झोकून देणाऱ्या सतीची.


अजूनही आहे 

पुरुषांचं वर्चस्व

त्यालाच मानीत आली

स्त्री आपलं सर्वस्व.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy