स्त्री सन्मान
स्त्री सन्मान
काय उपयोग वेड्या
आदिशक्तीचा जागर करुन
नाही उमगली ती
तुला माणूस म्हणून...
नाही व्हायचे रे तिला
त्यागाची मूर्ती...
नाही पसरली तरी चालेल
तिची जगभर कीर्ती..
नको तिला देव्हारा
नको बसवू मंदिरी..
दे थोडे स्थान
तुझ्या मनाच्या गाभारी..
नवदुर्गेची पूजा करतो
जाऊन मंदिरात..
नऊ रुपात वावरते ती
अवतीभवती तुझ्या घरात..
खऱ्या अर्थानं होशील विजयी
जर का देशील स्त्रीला मान..
हीच आहे खरी पूजा
आदिशक्तीचा सन्मान..
