पिंजरा
पिंजरा
1 min
216
नाही राहिले पंखात बळ
कशी उडून जाऊ
ठेऊन सोन्याच्या पिंजऱ्यात
म्हणतात ऐतखाऊ
छाटून पंख सारे
घेतले स्वातंत्र्य हिरावून
काही करीत नाही म्हणून
दाखवती हिनावून
बाहेरचं जग कसं
कधी नाही पाहिलं
अज्ञानाने आहे
चहूबाजूंनी घेरलं
आत्मविश्वासाने करून
टाकलं आहे पांगळ
मनी नाही उभारी
झालंय ते दुबळ
