नाते पतिपत्नीचे
नाते पतिपत्नीचे
साथ जन्मोजन्मीची
सात जन्म लाभावी
वडाला पूजन ती
दरवर्षी मागावी.
सप्तपदी चालताना
वचन तू दिले मला
सुखदुःखात कायम
सोबत करीन तुला.
दिवसागणिक नाते हे
अजून घट्ट व्हावे
झाडाला लागून
वेलीने जसे बहरावे.
वीण नात्याची
कधी न उसवावी
एकमेकांचा आदर
याची जाण ठेवावी.
एकमेकांना भक्कम
आधार आपण देऊ या
नाते पतिपत्नीचे
मनापासून जपू या

