वैभवशाली मराठी भाषा
वैभवशाली मराठी भाषा
माय माझ्या मराठीची
किती गाऊ गाथा
शोभे जणू चंद्रकोर
शिवबाच्या माथा
आजी गाई ओवी
पहाटेच्या प्रहरी
वासुदेव जागवी
चैतन्याच्या लहरी
काकड आरतीने
सकाळची सुरुवात
शुभंकरोतीने लागे
संध्याकाळी सांजवात
रानावनात वेचते
बहिणाबाई अमृत
माय माझी मराठी
होतं असे कृतकृत
गर्वाने करू साजरा
गौरवशाली गौरव दिन
वेगवेगळी बोली जरी
असे मायबोलीची घट्ट वीण
जणू कोंदणारील कोहिनुर रत्न
वैभवशाली मराठी भाषा
सातासमुद्रापार होवो ख्याती
हीच मनामनात अभिलाषा
