बाप
बाप
1 min
132
लावी छातीशी प्रेमाने
आई बाळ तिचा तान्हा
आहे काळीज बापाला
जरी फुटला ना पान्हा.
आई सारखं बाबांना
व्यक्त होता आलं नाही
झिजवली काया त्यांनी
सारी लेकरांच्या पाई.
काही कमी पडू नये
याची काळजी सगळी
व्यक्त होण्याची पद्धत
थोडी असते वेगळी
बाबा मारेल आम्हाला
भीती नाहीच वाटली
त्यांच्या धकातही होती
ऊब प्रेमाची दडली
बाप किती अनमोल
नातं तेव्हा उमगलं
बाप नावाचं छप्पर
जेव्हा आम्ही हरवलं.
