भाऊबीज
भाऊबीज
1 min
608
भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा
सण हा आला भाऊबीजेचा.
खट्याळ आणि खोडकर अस हे नातं
लहानपणीच्या आठवणींनी उर भरून येतं.
रुसवे फुगवे काढण्यात बालपण गेलं
माहेरच्या ओढीने मनाला भूतकाळात नेलं.
माहेरच्या वाटेची सदा असते ओढ
रक्ताचं हे नातं सदा राहावं गोड.
पवित्र नात्यात नको कधी तेढ
भावंडांच्या भेटीच सदैव असावं वेड.
दीर्घायुष्य लाभो आपल्या या नात्याला
ताटातूट,कटुता कधी न येवो वाट्याला.
