मोहपाश
मोहपाश
किती काळ असे तीळ तीळ तुटावे
रोज थोडे थोडे तुझ्यासाठी मरावे.
रोजचेच झाले मनानी या झुरावे
का असे आले तुझ्या माझ्यात दुरावे.
प्रेमाचे माझ्या काय देऊ पुरावे
काय असं करू की तुला ते पटावे.
जवळ येता मी मला दूर तू लोटावे
तरी ही मनानी माझ्या तुला रोज स्मरावे.
तुझा नसताना ही तुझ्यात मी उरावे
खुशाल मग दुनियेने मला वेडा म्हणावे
कळत नाही मला आता काय मी करावे
तुझ्या आठवणीत सारे आयुष्य हे सरावे.
तुझ्या शिवाय मला वाटत नाही जगावे
इच्छा एकच होती तुला ते कळावे.
मरणाच्या वाटेवरचे हे पाऊल माझे बारावे
आता वाटतही नाही मागे ते वळावे.
का अस तू माझ्या मनाला छळावे
शेवट तू आता माझे घालावे तेरावे.
मरणाचे माझ्या तुला येतील सांगावे
तुझ्या एका अश्रूसाठी पार्थिवाने तिष्टत पडावे.
देहानी या आता सरणावर जळावे
मनानी ही या सारे मोहपाश सोडावे.
