विंगेतल विश्व
विंगेतल विश्व


रंगभूमीत आयुष्य आणि आयुष्यात रंगभूमी यासारखं सुख नाही....
पडद्यासमोर दिसणारे दिग्गज आणि पडद्यामागे राबणारे हात याची तुलनाच नाही
अस हे विंगतल विश्व असतच लय भारी
वास्तवाच्या पलीकडचं
सुख, दुःख, धुंदी आणि मस्तीने वेढलेलं
अस हे विंगतल विश्व असतच लय भारी
यात तालमीची तर वेळच न्यारी
दिवसा रात्रीचे पात्र वेगळे परि पडद्यामागची एकच मंडळी
लाइट्स आणि कॅमेरा यांच्या पलीकडच्या या विश्वात
प्रेक्षकांना न दिसणारी एक वेगळीच दुनिया...
भाषा, संवाद, टिंगलटवाळी, राग, लोभ आणि निव्वळ प्रेम
यांची जुगलबंदी....
अशा या विंगेतल्या विश्वाची मजाच लय भारी
इथे मेकपची घ
ाई, ड्रेसपची तयारी सार्याचीच जबाबदारी यांच्यावर असते
कलाकार चुकला तर कॅमेरा रिटेक होत असतो,
पडद्यामागची मंडळी चुकली
पण ही पडद्यामागची मंडळी चुकली
तर यांना सेकंड चान्स नसतो
कलाकारांच्या हातात स्रिप्ट, पात्राप्रमाणे वेशभूषा असतात
तर या मंडळींच्या हातात पाण्याच्या बाटल्या
अन अंगावर स्वयंसेवकाचे बिल्ले असतात..
काम, शिक्षण प्रसंगी नोकरी आणि घर पणाला लावून
कलाकार रंगमंचावर आणि स्वयंसेवक विंगेतल्या विश्वात
असं हे चक्र अखंडित चालूच असतं
कागदावरच्या डागांनी ते रेखाटनं तितकचं अवघड असतं
विंगेतल विश्व हे असचं असतं
विंगेतल विश्व हे असचं असतं......