विडंबन...!
विडंबन...!
ती वर्षा मी वरुण
ती सर पावसाची
मी मुसळधार पाऊस
ती बिजली
मी गडगडाट
ती भिजली
की होतो मला त्रास
तिच्या येण्याची चाहूल
माझ्या येण्याचा भडीमार
ती नाही तर आत्महत्या
मी आलो तर नासधूस
एकाच आभाळाची
परि मतभेद फार
अशा पावसाचे
रुपच भन्नाट