STORYMIRROR

Ishwari Shirur

Romance Inspirational

3  

Ishwari Shirur

Romance Inspirational

आकृती

आकृती

1 min
251

कोऱ्या कागदावर माझ्या तू पेरला रंग आशेचा 

तान्ह्या हातात माझ्या दिला ओंकार लेखणीचा 


वात्सल्याचा प्रकाश तुझा दुरावल्या वासनेच्या वाटा

पुन्हा पुन्हा पदरात घेऊन कित्येक चुका तू माफ केल्या


तुला नसे आठ तासांची ड्युटी ना असे कधी सुट्टी 

महिन्यातले ते चार दिवस तरी तू घेते का विश्रांती?? 


लोक सगळी म्हणतात आई होणं कठिण असतं

तुला पाहिल्यावर मात्र मला सगळंच सोप वाटतं 


दुनियेत या देवाने घडवली एक गजब आकृती 

दैव माझे मला तु आई म्हणून याजन्मी लाभली


माऊली तू जगताची विणते गुंतलेले धागे सारे 

कुशीत घेते पिलांना जशी सारी तुझीच लेकरे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance