Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Ishwari Shirur

Others Children


3  

Ishwari Shirur

Others Children


पावसाचे रुप न्यारे..

पावसाचे रुप न्यारे..

1 min 148 1 min 148

कोकिळीचे गाणे तूझी चाहूल घेऊन आले

थेंब पावसाचे मन चिंब भिजवून गेले 

ओल्या मातीत पेरलेली बीज अंकुरली 

साचलेल्या पाण्यात नौकांची रांग सजली 


आगमनाने तुझिया भहरले सारे मळे 

हिरव्यागार शिवाऱ्यांनी मळब दाटून आले 

भेगाडलेल्या धरणीच्या डोळ्या स्वप्ने ओली 

आसुललेल्या नयनांची तृष्णा तृप्त झाली 


दिवसागणिक बदलणारे रुप तुझे पाहता 

हलकेच तुझ्यात रमणारे मन उदास झाले 

कधी रिमझिम कधी मुसळधार बरसणारे

सोंगाड्यापरि रुप तुझे मला नकोसे झाले 


अनपेक्षित पुराचे धक्के आता सोसवेना झाले

त्सुनामीचे विक्राळ रुप पाणावले नेक डोळे 

माणसाच्या करणीची चांगलीच अद्दल घडवली 

मुंबई, चेन्नई सह कोल्हापूरातही त्राही माजली


असे पावसाचे रुप आणखी किती वर्णावे

स्वच्छंदी तु, तुला कवितेत कसे बांधावे

नेक रुपे तुझी एका कवितेत माझ्या माहवेना

तुला लिहिल्याखेरीज माझ्या लेखणीला राहवेना 


Rate this content
Log in