STORYMIRROR

Ishwari Shirur

Fantasy

3  

Ishwari Shirur

Fantasy

मी आणि तु...

मी आणि तु...

1 min
62

मी आणि तु.... 


मी तुझं प्रेम तू इश्क माझं 

मी केशरी, हिरवा तुझा रंग 

मी दसरा तु रमजान गं

तु मुके अल्फाज मी शब्दकोडे गं


मंदिरातल्या देवावर तुझा विश्वास

तुझ्यासाठी चार वेळेचा नमाज करायला मी तयार

कथा कुराणाच्या तु सांग मला 

गीतेचा अध्याय मी सांगेल तुला


मंदिरातल्या अल्लाहला घालं तु साकड 

दर्ग्यातील देवाला मी दुवा मागतो

होशील का तु माझी बेगम 

होईल मी तुझा पति परमेश्वर


माझ्या आनंदाची तु शिरखुर्मा हो

तुझ्या सुखात मी शिरा होतो

हिंदू मुस्लिम नको आता 

माणूस म्हणून करुणेचं बीज पेरु


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy