अश्रुंनाही ओढ तुझी...
अश्रुंनाही ओढ तुझी...


सगळे सुपीक असतानाही
वाट तुझी मी पाहत होती
शेतशिवार हिरवेगार तरी
अश्रुंना तुझीच ओढ होती
झिरपणार्या तुझ्या थेंबाने
अश्रु माझे लपणार होते
तुझी चाहूल लागताच
आठवणींना मी कैदले होते
वार्षिक आठवणींचा बांध
तुझ्यात मिसळून वाहतो
कधीतरी बरसणारा तु
सतत नव्याने जगवितो