सोन्याची चिमणी
सोन्याची चिमणी


व्यवहारात भाषेची सवत भेट देऊन
गोर्यांनी पळवली सोन्याची चिमणी
स्वदेशीचा मंत्र क्षणार्धात विसरून
बरी स्विकारली पाश्चात्य संस्कृती?
फिरंग्यांच्या गॅझेटने अख्खी तपोभूमी पोखरली
माणसामाणसात दिसतेय आता डिव्हाइड अँड रुल पॉलिसी
७३ वर्षे उलटून गेली मिळून ही आझादी
आता तरी परदेशीचा मोह सोडेल का स्वदेशी
या धर्मनिरपेक्ष देशात लाखोंच्या कत्तली खुलेआम होताय
हिरवा केशरी वादात तर अख्खा भारत आज गुरफटलाय
डिजिटलच्या नावाखाली सैनिक PUBG मध्ये अवतरला
रक्तरंजित होळी खेळणारा हुतात्मा मात्र काळाआड दडला
जुने पाश तोडून स्वातंत्र्याचे नव्याने गीत गाऊनी
स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे
स्वदेशीला स्विकारुन पुन्हा घडवू सोन्याची चिमणी
अन् गुण्यागोविंदाने नांदू, गाऊ गाणे समतेचे
स्वतंत्र भारताचे नौजवान मावळे आम्ही
महाराजांच्या स्वराज्याचे चला सुराज्य बनवू
गनिमालाही हादरवेल अशी नव्या भारताची छबी
चला सुजलाम सुफलाम समृद्ध भारत देश घडवू