Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mina Shelke

Classics

4  

Mina Shelke

Classics

देव दगड

देव दगड

1 min
438

।। देव दगडाचा ।।

शेंदूर फासून। उभारला देव

सोंगाड्यांचे पेव । जागोजागी 

बघण्या त्या देवा। फिरतोय भोंगा

भक्त लावी रांगा । गावोगावी

नवसाला म्हणे । पावतो दगड

फेकता रोकड । सुख देतो

बोकड कवटी । नैवद्याची ताटी

तया पोटासाठी । द्यावी म्हणे

कलियुगी असा । ढोंग्याचा बाजार

लोभाचा आजार । सर्वठायी

श्रध्दा ही कोणती ? । जित्याला सोडून

 तत्वास गाडून । होते पूजा

अन्नाची नासाडी । याच्या पायापाशी

दुबळा उपाशी । दारोदारी

भान नाही जना । करतोय काय !

जन्मदात्री माय । निराधार

कसा व्यवहार । करितो मानव

बरा तो दानव । लंकापती

पैक्याचे हे दान । दगडाच्या पाया

घालतोय वाया । निर्बुद्ध हा...

हरवली मती । तोडूनिया नाती

मागतोय गती । जीवनाला ...

मिनू म्हणे ऐका । बोळवा विचार 

नेटका आचार । व्हावा आता 

Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics