आम्ही भारतीय ,महाराष्ट्रीय अम
आम्ही भारतीय ,महाराष्ट्रीय अम
सोसतो जरी आम्ही दुष्काळी झळा
फुलवितो तरीही सावताचा मळा
नाहीच पडत कमी कुठल्याच क्षणी
राकट आम्ही , कणखर आम्ही ...
आम्ही भारतीय ,महाराष्ट्रीय अमुचा बाणा ..
साहित्य , कला, क्रीडा , राजकारण
प्रशासन , शेती असो समाजकारण
नेहमीच असतो सज्ज इथला रांगडा गडी
नावाप्रमाणे महाराष्ट्रपुत्र कर्तृत्व सिद्ध करी
आम्ही भारतीय ,महाराष्ट्रीय अमुचा बाणा
चला गड्यानो ! शपथ घेऊया १ मे या शुभ दि
नी
जातीभेद , हुंडाबळी , भ्रष्टचारही नाही होऊ देणार
खांद्याला -खांदा लावून लढा देऊ गड्यानो चला ...
सर्वंकष क्रांतीची मशाल हाती घेऊया पुन्हा ...
आम्ही भारतीय ,महाराष्ट्रीय अमुचा बाणा
या मातीत जन्मल्या राजमाता जिजाऊ म्हणून ....
शिवबा घडला आणि शिवबानं महाराष्ट्र घडवला
फुले शाहू आंबेडकर ,क्रांतीज्योती सावित्रीनेही
दिले योगदान तेव्हा स्त्री - पुरुष समानता साकारली
आम्ही भारतीय ,महाराष्ट्रीय अमुचा बाणा ...