STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Abstract Classics

4  

शिल्पा म. वाघमारे

Abstract Classics

निसर्ग किमया

निसर्ग किमया

1 min
571

भव्यदिव्य पुस्तिकाच

दिव्य सारा हा निसर्ग

जणू धरणीवरचा

मोहमयी प्रतिस्वर्ग ....... ||१||


खुले रश्मी उधळण

प्राची अंगणी उमले

रेखाटतो येता रवी

रांगोळ्यांची नक्षीफुले... ||२||


किलबिल पाखरांची

वृक्षांवरी ती माधुरी

अद्भुतच कलाकृती

तरुवर पर्णांवरी.......||३||


अचूकता साधलेली

भरतीची-ओहोटीची

ऋतुराज्ञी वर्षभरी

बहरल्या कुसुमांची....||४||


पंकातील दल नित्य

तुम्हा-आम्हा सांगे स्थैर्य

पूर आणि वादळेही

शिकविती धीर-धैर्य....|| ५||


फुले निसर्ग किमया

येथे वात्सल्यकुशीत

होऊ 'माणूस',चला हो

देणे शिकू घेत घेत......||६||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract