STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Inspirational

3  

शिल्पा म. वाघमारे

Inspirational

सार प्रेमाचे

सार प्रेमाचे

1 min
215

नित्य दुर्भिक्ष्य येथ प्रेमाचे

जगी पावित्र्य नासत आहे

प्राणांचा जो श्वास निरंतर

दूर तो विश्वास भासत आहे... १


हरवले प्रेम का अन् कोठे

शोधले रानोमाळ नि किनारे

क्षणांत हतबल स्वार्थापुढती

हरलास तू ही मनसजना रे...२


हृदये प्रेमरहीत विकारी

 केवळ छळतो सुखाभास आहे 

 भयाण कळीकाळ साहतो आम्ही 

हरवलेला ध्येयाचा ध्यास आहे ...३


निर्मळ आर्त निरपेक्षतेत ते 

 सहजभावात विशुद् धता वाहे

तृप्ती शांती निरव तेथेची 

 डोकावूनी तव अंतर पाहे...४


प्रेमात सार सारे दडले

जाणूनी घेई चिरकाल सुखाचे

अमृतकुंभ तो हरवून खरा

प्राशतोस घोट तू का दुःखाचे?...५


कळेचना मज कशी मी वर्णू

विद्रूप नीच विकारी ते भाव

विरहात बुडतो आहे प्रेमाचा 

 निरागस रे हा सृष्टीचा गाव...६


अशक्य वास प्रेमाचा तेथ

बिलगते जेथ ती आसक्ती

दीप मालवता अनुरागी

मग ना शांती ना मुक्ती...७


सागर करी तुझिया मना 

श्वासांवर का चालली सत्ता कधी कुणाची?

प्रेमरुपी भक्तीत हरव ना

बघण्या प्रचिती दिव्यत्वाची...८


गीतामृत तो मंत्र अद् भूत

 माधवचि एक प्रेममय झरा

शीक सांडूनी माया-मोहा

सोपवी भार पायी त्या सारा...९



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational