STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Inspirational

4  

शिल्पा म. वाघमारे

Inspirational

अखंड धागा हो

अखंड धागा हो

1 min
264

चल उठ माणसा तू

आतातरी जागा हो

सृष्टीच्या विणीतला रे

अखंड एक धागा हो... १


अनुबंध माणसांचे

उसवत चाललेले

स्वार्थाच्या दलदलीत

निसटते पाय झाले...२


अविचारी भाव सर्वथा

नि त्रागा राकट मोहाचा

त्राही त्राही झाली धरा

विसर तुज मूळ तत्त्वांचा...३


आपुलकी जगते आहे

अजुनही या चराचरी

श्रेष्ठ म्हणवून स्वये

आचरण तुझे दुराचारी...४


अतीवतेला भरते आले

संकटाच्या झंझावाती

पुरे आता मनमानी

आनंदाच्या पेटव वाती...५


निसर्ग महा‌दानी भला

जाण खरे गुरुश्रेष्ठाला

कोप होता असहाय तूही

अनाठायी मुकतो श्वासाला...६


विणकर तोच पहिला

आदिनाथ उद्गाता

सावर तुझिया मना

काळ न होई गोता...७


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational