STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Fantasy Inspirational Others

3  

शिल्पा म. वाघमारे

Fantasy Inspirational Others

होळी कुविचारांची

होळी कुविचारांची

1 min
155

धगधगते तुफान चेतू दे मनी

पेटव रान विषयांचे विषारी 

संयम, शांती जागवून मित्रा

दीप्ती हो काळोखाच्या प्रहरी...१


स्वतःस झोकूनी सत्कर्म सागरी 

भान हरपावे नित्य निरपेक्षतेत

कुविचारांची करुया होळी या क्षणी

जीवनपुष्प गंधाळावे प्रेमरंगी वसंतात...२ 


सन्मार्गावर चालायचे आता

कुविचारांची करुया होळी

शुद्ध विचारपेरणी करावी

उज्ज्वल टिळा लावूनी भाळी...३


माणूस पाहू माणसातला

प्रेमाचा स्पर्श त्याला देऊ

त्या गालावरच्या चंद्रखळीचे

आज चला हो निमित्त होऊ...४



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy